भाजप कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी संजय वासुदेव पवार यांची नियुक्ती
  सरचिटणीसपदी संजय वासुदेव पवार... 


पनवेल, दि.1 (संजय कदम) ः भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांच्या आदेशानुसार कामगार नेते संजय वासुदेव पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात आली.
कामगारांचा साठी आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कार्य देशाबाहेर अडकलेली हजारो कामगारांना देशात सुखरूप परत आणण्याचे कार्य शिपिंग जहाजावर काम करणार्‍या कामगारांचा न्यायहक्कांसाठी लढा, जल प्रदूषण, मच्छीमार समाजासाठी देखील कार्य या कार्याचा गौरव करण्यामध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झालेले संजय पवार यांची त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



फोटो ः संजय पवार
Comments