प्लास्टिक प्रदूषण टाळण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम,कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था व महापालिका यांच्या सहकार्याने बसविण्यात आला लोखंडी पिंजरा..
प्रदूषण टाळण्यासाठी बसविला लोखंडी पिंजरा..


पनवेल दि १५,(संजय कदम) :  दिवसेंदिवस वाढत जाणारे प्लास्टिकचे प्रदूषण, इतस्ततः दिसणाऱ्या प्लास्टिक बाटल्या, यावर उपाय शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि पनवेल महानगर पालिका यांच्या सहकार्याने करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे आज भाजी मार्केट, पनवेल येथे प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यासाठी एक लोखंडी पिंजरा बसविण्यात आला. 
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 चे द्वितीय प्रांतपाल ला. संजीव सुर्यवंशी तर विशेष अतिथी म्हणून कमळ महिला पतपेढी चे संस्थापक शशिकांत बांदोडकर, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी शैलेश गायकवाड आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. 
               याप्रसंगी बोलताना ला. सुर्यवंशी यांनी सांगितले की हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि आवश्यक आहे. पनवेल मधील नागरिकांनी याचा योग्य उपयोग केला पाहिजे. पनवेल सरगम क्लब नवीन असून सुद्धा उत्तम समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्यामुळे कौतुक केले. त्यांनी आवाहन केले की पनवेल महानगरपालिकेच्या बरोबर असेच संयुक्त उपक्रम लायन्स क्लबच्या माध्यमातून आयोजित करावेत. सरगम क्लब च्या अध्यक्षा ला. स्वाती गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि पनवेल महानगर पालिका यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. या प्रसंगी ला. अलकेश शहा, प्रेमेंद्र बहिरा, जयेश मणियार, सुनील देशपांडे , संजय गोडसे, रोटरी क्लब पेण चे श्री शहा, पनवेल महापालिकेचे महेंद्र भोईर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



फोटो - लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे सामाजिक उपक्रम
Comments