सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी हनुमंत अहिरे यांची पदोन्नती...
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी हनुमंत अहिरे यांची पदोन्नती...
पनवेल वैभव / दि.२५(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणारे हनुमंत घनश्याम अहिरे यांची नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे यांनी करंजाडे पोलीस चौकीच्या नूतनीकरण व उदघाटन प्रसंगी केले. 
      हनुमंत अहिरे यांनी आत्ता पर्यंत पोलीस खात्यात केलेल्या नोकरीमध्ये विविध क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. त्याच प्रमाणे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले आहेत. दरम्यान महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना बढती मिळून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचे विशेष अभिनंदन  पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे,  सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक कामत, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, पोलीस उपनिरीक्षक दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक चौगुले आदींनी केले आहे. 



फोटो: उपायुक्त पंकज डहाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी हनुमंत अहिरे यांचे अभिनंदन करताना
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image