पनवेल मध्ये जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा ; पाच दिवसाच्या डाक सप्ताहाचे जंगी आयोजन...
पाच दिवसाच्या डाक सप्ताहाचे जंगी आयोजन...


पनवेल / प्रतिनिधी -  : जागतिक टपाल दिनानिमित्त नवीन पनवेल येथील पोस्ट कार्यालयाच्या मुख्य इमारतीत जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला .या दिनाचे औचित्य साधून ९  ते १३ ऑक्टोंबर या कालावधीत पाच दिवसाचा डाक सप्ताहाचे आयोजन केले असल्याची माहिती पोस्टमास्टर जनरल  गणेश व्यंकटराव सावळेश्वरकर यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी पोस्ट खात्याने घेतलेली आर्थिक भरारी व विकासात्मक माहिती उपस्थित पत्रकारांना दिली.
            जगभरात जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा होत असताना नवीन पनवेल मध्ये असलेल्या जनरल पोस्टमास्तर कार्यालयाच्या प्रमुख इमारतीमध्येही जागतिक टपालदिनाचे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या दिनानिमित्त पोस्ट कार्यालयाच्या इमारतीला रंगीबेरंगी फुग्यांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. यावेळी पोस्ट मास्तर जनरल गणेश व्यंकटराव सावळेश्वरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पोस्टाच्या असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. पोस्ट कार्यालय सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत असे बारा तास जनतेला सेवा देऊन अजूनही जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारे एकमेव शासकीय कार्यालय असल्याची माहिती त्यांनी दिली .पोस्ट जनरल या परीक्षेत्रामध्ये नवीन पनवेलच्या कार्यालयाने तब्बल  ३०० कोटीचा आर्थिक कारभार गत वर्षी करून अव्वल स्थान अव्वल मिळवले आहे. 
पोस्ट बँक ,आधार सेवा ,पासपोर्ट सेवा ,विमा  पॉलिसी, सुरक्षित ठेव योजना,कुरियर सेवा ,राज्य देशांतर्गत व परदेशातील कुरिअर सेवा तसेच रेल्वेच्या माध्यमातून ही मोठ्या प्रमाणावर वस्तू देवाण-घेवाण सेवा ही करण्यात पोस्टाने भरारी घेतल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. जनतेला अग्रभागी स्थान देऊन चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यामध्ये पोस्टाने विविध उपाययोजना करून विविध प्रकारचे आक्रमण होऊ ही पोस्टाने टपाल सेवेबरोबरच अन्य सुविधांमध्येही मोठी भरारी घेतली आहे. जनतेच्या पसंतीत पोस्टाने स्थान मिळवून जास्तीत जास्त चांगल्या सेवा देण्यासाठी पोस्टाचे सर्व कर्मचारी झटत आहेत. पाच दिवसाच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्य सप्ताहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन पोस्टाच्या ग्राहकांसाठीच करण्यात आले आहे. या उपायोजनांचा फायदा नागरिकांनी जास्तीत जास्त करून घेण्याचे आवाहन यावेळी  पोस्टमास्तर जनरल  गणेश व्यंकटराव सावळेश्वरकर यांनी केले आहे.
Comments