बुद्ध धम प्रचार प्रसारक समितीचा वर्षावास सांगता कार्यक्रम संपन्न...
 वर्षावास सांगता कार्यक्रम संपन्न...


पनवेल दि.३०(संजय कदम): तथागत बुद्धानी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भिक्खू संघाला धम्मप्रचार प्रसारासाठी सारनाथ येथे दिलेला उपदेश, याच उपदेशाचे पालन करीत पनवेल येथील बुद्ध धम्म प्रचार प्रसारक समिती ने वाली अपार्टमेंट येथे वर्षावास सांगता कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 
       आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते  नरेंद्र गायकवाड यांच्या आग्रहास मान देवून भारत राष्ट्र समिती चे पनवेल विधानसभा उप समन्वयक , व महानगर समन्वयक व बाबासाहेब लिगल पँथर चे अध्यक्ष प्रा. प्रफुल पंडीत भोसले सर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास भेट दिली. या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षातील नेते मंडळीं उपस्थीत होते. विजय गायकवाड यांनी प्रा. प्रफुल भोसले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. बौद्ध धम्मात वर्षावासाचे खुप महत्व आहे. याची सुरुवात भगवान बुध्द यांनी केली. वर्षावासाच्या तीन महिन्यात बौद्ध भिक्खुसंघ विहारात राहून बौद्ध धम्माच्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास, मनन आणि पठण करतात. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वर्षावास सुरू होतो आणि तो अश्विन पौर्णिमेला संपतो. बुद्धांच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्खुंना चारही दिशांना जाऊन धम्माचा प्रचार-प्रसार करण्याचे आदेश दिले. आणि सर्व बौद्ध भिक्खु या कार्यात गुंतले, परंतु हे कार्य करत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले विशेषतः पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने हे बौद्ध भिक्खु वाहून जायचे आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान व्हायचे, म्हणून तथागत बुद्धांनी आषाढ पौर्णिमे पासून ते अश्विन पौर्णिमे पर्यंत या वर्षा ऋतूतील सलग तीन महिन्याच्या काळात सर्व भिक्खुंनी एकच ठिकाणी राहून धम्माचा प्रसार करावा असे संगितले . सलग तीन महिन्याचा वर्ष वास झाल्यानंतर अश्विन पौर्णिमेनंतर सर्व भिक्खू संघ पुन्हा मानव हितासाठी व सुखासाठी गावोगावी प्रचार-प्रसार करण्याच्या हेतूने बाहेर पडतो या दिवशी भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसाराचे नवीन वार्षिक वर्ष सुरू होते म्हणून बौद्ध धम्मात या पौर्णिमेचे अधिक महत्व आहे.


फोटो: बुद्ध धम प्रचार प्रसारक समितीचा वर्षावास सांगता
Comments