पनवेल शहर पोेलिसांनी केले गजाआड...
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः पनवेल जवळील पळस्पे येथील मारुती ट्रु व्हॅल्यू या कंपनीत कॅशिअर म्हणून काम करणार्या एका इसमाने कंपनीच्या व्यवहारात फेरफार करून ग्राहकांच्या नावे चुकीच्या आर्थिक नोंदी घेवून कंपनीच्या व्यवहारातील 50 लाख 70 हजार 178 रुपयाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून सदर रकमेचा अपहार करणार्या इसमास पनवेल शहर पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
अनिकेत पंडित (32) हा पळस्पे येथील मारुती ट्रु व्हॅल्यू कंपनीत कॅशिअर म्हणून काम पाहत असताना त्याने कंपनीच्या व्यवहारात फेरफार करून ग्राहकांच्या नावे चुकीच्या आर्थिक नोंदी घेवून कंपनीच्या व्यवहारातील 50 लाख 70 हजार 178 रुपयाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून सदर रकमेचा अपहार करून तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेेंद्र जगदाळे व पोलीस हवालदार परेेश म्हात्रे हे अधिक तपास करीत असताना परेश म्हात्रे यांनी सदर आरोपीचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला असता सदर आरोपी हा पुणे कोंढवा येथे लपल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस आपल्या मागावर आहेत व त्यांना सापडू नये यासाठी सदर आरोपी हा पुणे कोंढवा येथील आपल्या घरात गेल्यावर बाहेरून मुख्य दरवाजाला कडी-कुलूप लावून आत बसत असेे व याकामी त्याला त्याची पत्नी मदत करीत होती. परंतु परेश म्हात्रे यांच्या विशेष तपासामुळे अखेरीस हा आरोपी पोेलिसांच्या हाती लागलाच आहे.
फोटो ः आरोपी अनिकेत पंडित