पनवेल शहर पोलीसांनी केले परंपरागत पद्धतीने शस्त्र पूजन...
पनवेल शहर पोलीसांनी केले परंपरागत पद्धतीने शस्त्र पूजन...

पनवेल वैभव / दि.२४(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्यात दसऱ्यानिमित्त परंपरागत पद्धतीने शस्त्र पूजन परी मंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सपत्नीक केले. 
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आज वर्षानुवर्ष परंपरागत सुरु असलेला दसरा निमित्ताने शस्त्र पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परी मंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सपत्नीक उपस्थित राहून शस्त पूजन विधिवत पद्धतीने केले. यावेळी बोलताना अधिक राजपूत यांनी सांगितले की, वाईट प्रवुत्तीणीचा बिमोड करण्यासाठी या शस्त्रांचा उपयोग करावा अनेक वर्षानूवर्ष ही परंपरा प्रत्येक पोलीस ठाण्यात करण्यात येते आजही दसऱ्यानिमित्त शस्त्र पूजन केले जात आहे. आजचा दिवस महत्वाचा असून समाजात सुख, आनंद, शांती राहण्यासाठी  पोलीस बांधव २४ तास कर्तव्य बजावीत असतात यावेळी ते आपले घरादाराचा विचार न करता आपले कर्तव्य बजावत असतात त्यामुळे अशाप्रकारचे कार्यक्रम सर्व पोलीस बांधवांसाठी पोलीस ठाण्यातच करण्यात येतात व सर्व जण एकत्रितपणे येऊन ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आंदण लुटतात या पेक्षा समाधान काय असणार आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी महिला दक्षता समितीच्या माधुरी गोसावी, पत्रकार संजय कदम, साहिल रेळेकर, मयूर तांबडे, मिलिंद मोडघरे, परदेशी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. शस्त्र पूजनामध्ये पिस्टल, लाठीकाठी, रायफल, एके ४७, अश्रूधूर, बेड्या तसेच अत्याधुनिक  शस्त्रांची पूजा करण्यात आली.



फोटो: शस्त्र पूजन
Comments