सिडकोसोबत बैठक लावणार- खा.श्रीरंग बारणे..
पनवेल दि.०९(संजय कदम): पारगाव परिसरातील नागरी समस्यांबाबत अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून येत असून या समस्या सोडवण्यासाठी लवकरच सिडको सोबत बैठक लावणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे.
जय हनुमान सार्वजनिक मित्र मंडळ पारगाव व ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित गौर गणेशोत्सवाला भेट देताना खा. श्रीरंग बारणे यांनी केलेल्या भाषणात या विभागातील समस्या सोडवण्यासाठी सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा करत आहे व या पूढे सुद्धा करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी सरपंच तथा सदस्य निशा रत्नाकर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक, रत्नदीप पाटील, माजी उपसरपंच तथा सदस्य अंजली राहुल कांबळे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मनोज दळवी, राहुल कांबळे, कार्यकर्ते सुनील पाटील, प्रवीण पाटील, कवी तारेकर, विजय पाटील, भालचंद्र मोकल, माणिक पाटील आदी उपस्थित होते.
फोटो: खा.श्रीरंग बारणे यांचे स्वागत