मराठा आरक्षण समर्थनार्थ लाक्षणिक उपोषण..
पनवेल दि.३१( संजय कदम): राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ करंजाडे परिसरात 1 नोव्हेंबर 2023 रोजी 10.00 ते 18.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येणार आहेत.
त्याअनुषंगाने आज पनवेल शहर पोलीस ठाण्यात मराठा समन्वयक यांची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आयोजित केली होती. या बैठकीला गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव उपस्थित होते. यावेळी नितीन ठाकरे यांनी कार्यक्रम शांततेत पार पाडून कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेणे बाबत उपस्थितांना आवाहन केले. सादर बैठकीला मराठा समन्वय समितीचे विनोद साबळे, विनोद चव्हाण, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, पराग मोहिते, भरत जाधव, अतिश साबळे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
फोटो: मराठा समन्वयक समिती बैठक