मा.नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांनी मानले पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, आ.प्रशांत ठाकूर व मा.सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार ....
आ.प्रशांत ठाकूर व मा.सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार  


पनवेल दि. ०९ ( संजय कदम  ) :  संपूर्ण महापालिकेच्या गार्डनची व  बगीच्यांची स्वच्छता तसेच निगा राखण्यासाठी कामगारांची नेमणूक करुन सकारात्मक कृती केल्याबाबत मा. नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, आ. प्रशांत ठाकूर व मा. सभागृह नेते परेश ठाकूर यांचे व्यक्तीशः व नागरीकांच्यावतीने आभार मानले आहेत.
                   या संदर्भात त्यांनी अधिक मागणी करताना सांगितले आहे की, महापालिका क्षेत्रातील प्रत्येक गार्डनमध्ये पाण्याची सोय मग ती नळाची असेल अथवा बोअरवेलची असेल तरी ताबडतोब सुरू करावी. तसेच प्रत्येक गार्डनची वेळ सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास अशाप्रकारे ठरवून दयावी व इतर वेळी बगीच्यांचे गेट बंद करावेत. तसेच प्रत्येक गार्डनमध्ये १ सिक्युरिटी गार्डची नेमणूक करावी. जेणेकरुन काही आंबट शौकिन विकृत चाळे करीत बसतात तसेच काही व्यसनी लोक विविध व्यसन करण्यासाठी प्रत्येक गार्डनमध्ये बिनदिक्कतपणे दारु पिणे, चरस, गांजा ओढणे या प्रकारची व्यसन करीत असतात, त्यामुळेगोर्डनमध्ये महिला, मुली अथवा वयोवृध्दांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस स्टेशनला फोन केला तरी योग्य ती कृती केली जात नाही. त्यामुळे आपण आपल्या ताब्यात असलेल्या महापालिकेला सर्व गार्डनमधील प्रत्येक गार्डनमध्ये झाडांसाठी पाण्याची सोय करणे, प्रत्येक गार्डनमध्ये सिक्युरिटी गार्डची नेमणूक करणे, गार्डनची सकाळ व संध्याकाळ वेळ ठरविणे व त्याबाबत बोर्ड लावणे,सर्व गार्डनच्या संरक्षक भिंती दुरुस्त करुन घेणे, अनावश्यक गेट पूर्णपणे बंद करणे,गार्डनमधील ओपन जीमचे नादुरुस्त साहित्य पुर्ववत करुन देणे, गार्डनमधील तुटलेली लहान मुलांच्या खेळाची साधने दुरुस्त करुन देणे, वॉकिंग ट्रॅक दुरुस्त ,नविन करुन चालणे योग्य करणे. या बाबींच्या लवकरात लवकर कृती आपल्याकडून व्हावी व सर्व सामान्य लोकांना दिलासा दयावा अशी देखील मागणी मा. नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या पत्रा द्वारे केली आहे . 





फोटो - मा. नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ
Comments