अपूर्वा नेमळेकर येणार पनवेलकरांच्या भेटीला..
पनवेल दि.१६(संजय कदम): सुप्रसिद्ध अश्या रात्री खेळ चाले या मालिकेत शेवंताची भूमिका करणाऱ्या अपूर्वा नेमळेकर या येत्या १८ नोव्हेंबरला संध्याकाळी ७.३० वाजता ओरायन मॉल येथे पनवेलकरांच्या भेटीला येऊन त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहेत.
येत्या 18 नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता ओरायन मॉल पनवेल येथे अपूर्वा नेमळेकर येणार असून पनवेल मधील सुप्रसिद्ध अश्या ओरायन मॉल हे त्यांच्या ग्राहकांसाठी दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम घेऊन येतच असतात, यावर्षी विक्रम लँडर हुबेहूब येथे साकारण्यात आलेले आहे तर ते बघण्यासारखा नक्कीच आहे. परंतु शॉप अँड विन कॉन्टेस्ट होणार आहे आणि त्याचा लकी ड्रॉ पण काढण्यासाठी व विजेत्यांना बक्षीशे देण्यासाठी अपूर्वा नेमळेकर येणार असल्याची माहिती ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांनी दिली.
फोटो: अपूर्व नेमळेकर