पनवेल शहर शाखेतर्फे वाहण्यात आली आदरांजली...
पनवेल दि.१७(संजय कदम): हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ११व्या स्मॄतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखेत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेना पनवेल शहर संघटक(महिला आघाडी) अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, उपमहानगर संघटक अच्युत मनोरे, पनवेल शहर संघटक राकेश टेमघरे, मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे, उपशहरप्रमुख सुजन मुसलोंडकर, उपशहर संघटक उज्वला गावडे, शाखा प्रमुख भास्कर पाटील, शाखा प्रमुख राजेश शेट्टीगार, मा. उपशहर प्रमुख यशवंत भगत, ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण पाचाळ, मयुर दसवते, अरुण ठाकूर, शशी भोपी, अशोक सावंत, अमर पटवर्धन, सचिन रणदिवे आदी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो: हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आदरांजली