शेकाप ने शब्द पाळला ; आदई करांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला...
सरपंच रमाकांत गरुडे यांचे नागरिकांकडून आभार...

पनवेल/प्रतिनिधी
नवीन पनवेलला लागूनच असलेल्या आदई गावामध्ये नागरिकीकरण झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे नागरीसुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळे आदई व नेवाळी या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. भविष्यात होणारी बांधकामे आणि त्यामुळे पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायतीची दमछाक होणार ही गोष्ट सरपंच रमाकांत गरुडे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला. जवळपास दोन वर्षांपासून सरपंच रमाकांत गरुडे जलमीशन अंतर्गत निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जलजीवन मिशन अंतर्गत आदई नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत होवून नेवाळी व आदईकरांचा प्रश्‍न सुटला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेकरीता परिषदेने नियुक्त केलेल्या यश इंजिनिअर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. मार्फत आदई नळ पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यानुसार कामाला सुरुवात झाली असून नेवाळी व आदईकरांचा पाणी प्रश्‍न सुटल्याने नागरिक सरपंच रमाकांत गरुडे, उपसरपंच योगेश पाटील व माजी सरपंच विलास शेळके यांचे आभार मानत आहेत.
रमाकांत गरुडे यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विकासकामांची धडाका सुरु केला आहे. त्यांनी अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत आणि मुख्य प्रश्‍न होता तो पिण्याच्या पाण्याचा आता तो ही मार्गी लावल्याने जनता त्यांचे आभार मानत आहे.
Comments