मंदार काणे एंटरटेनमेंट व प्रिया इव्हेंट्सच्या आमचं ठरलंय या दिवाळी पहाट कार्यक्रमाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
       पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

पनवेल दि.१६(संजय कदम): मंदार काणे एंटरटेनमेंट आणि प्रिया इव्हेंट्स आयोजित फडके नाट्यगृह पनवेल येथे झालेल्या आमचं ठरलंय या  दिवाळी पहाट प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या कार्यक्रमासाठी रसिकप्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला 
         या वेळी पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे , भाजप महासचिव महाराष्ट्र प्रदेश आणि माजी उपमहापौर पनवेल महानगरपालिका विक्रांत पाटील ,भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना महानगर संघटक आणि माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप बँक लिमिटेड चे पनवेल शाखेचे सह व्यवस्थापक मयूर निजामपूरकर, चितळे एक्सप्रेस पनवेल चे पुष्कर कर्वे आणि अर्बन बँक च्या संचालिका माधुरी गोसावी त्याचसोबत डिजिटल पार्टनर म्हणून स्मृतिगंध या सर्वांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक मंदार काणे एंटरटेनमेंट चे सर्वेसर्वा मंदार काणे यांच्यातर्फे करण्यात आला. या कार्यक्रमाचे मंगला खाडिलकर यांनी संपूर्ण सूत्रसंचालन केले तर संपूर्ण वादकांची टीम अमेय ठाकूर देसाई यांची होती. त्याचसोबत उत्तम ध्वनि व्यवस्था देणारे सर्वेश गोखले आणि नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल नाट्यगृह व्यवस्थापक राजेश डोंगरे आणि पनवेल महानगरपालिका तसेच सर्व पत्रकार मान्यवर मंडळी , नाट्यगृह कर्मचारी आणि रसिकप्रेक्षकांचे मंदार काणे यांनी आभार मानले आहेत.



फोटो:  आमचं ठरलंय दिवाळी पहाट
Comments