अशोक कामटे स्मृती फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित शहीद दौड उपक्रमाचे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने स्वागत..
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने स्वागत..

पनवेल दि. २५ (संजय कदम): २६/११ रोजी झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करण्यासाठी तसेच या हल्ल्यात शहिद झालेल्या जवांनां श्रद्धांजली वाहण्यासाठी अशोक कामटे स्मृती फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी सांगली ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत शहिद दौड आयोजित करण्यात येते. त्याअंतर्गत यंदाच्यावर्षी आयोजीत करण्यात आलेल्या दौडचे पनवेल मध्ये आगमन झाले असून त्यांचे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पळस्पे पोलीस चौकी येथे स्वागत करण्यात आले.
         परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्या  मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्वागत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे यांनी आयोजन केले होते. यावेळी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजक श्रीकांत कुंभार, योगेश रोकडे. निलेश मिसाळ. घनश्याम डंके व त्यांच्या तीस जणांच्या पथकाचे पळस्पे येथे या दौडचे स्वागत केले. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच निष्पाप नागरिक शहीद झाले होते. या भ्याड हल्याचा निषेध करुन श्रद्धांजली वाहण्यासाठी २००९ साला पासून अशोक कामटे स्मृती फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली ने मुंबई गेट वे ऑफ इंडिया पर्यंत शहिद दौड आयोजित करण्यात येते. ४७० किलोमीटरची हि दौड असते यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात आणि या दौड च्या माध्यमातून देशद्रोहींना संदेश देतात की, तुम्ही पुन्हा हल्याचा प्रयत्न कला तर २००० किलोमीटर आत घुसून तुम्हाला नेस्तानाबूद करू हा इशारा देण्यात येतो. या वेळी बोलताना परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले कि, आजची तरुण पिढी अश्या प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी होत असल्याने त्यांचा जोश उत्साह वाढविण्याचे काम प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तर यावेळी बोलताना  वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले कि, २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या वेळेस मी स्वतः तिथे उपस्थित होतो सलग चार दिवस तेथे कर्तव्य बजावीत असतांना वेगवेगळ्या घटना, हल्ले स्वतः अनुभवले आहे. या हल्ल्यामुळे अनेक जण शहीद झाले परंतु अश्या  प्रकारचे धाडस यापुढे कुठलाही देश यापुढे करणार नाही हे आपण जगाला दाखवून दिले आहे. आयोजक श्रीकांत कुंभार यांनी सुद्धा आजची तरुण पिढी देश प्रेम सर्वात प्रथम बघते हे दिसून येते. आज आमच्या अकादमी मध्ये इयत्ता दहावी पासून उच्च शिक्षित मुले सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह यांच्यासह पळस्पे पोलीस चौकीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




फोटो - शाहिद दौड
Comments