खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथे नियमांबाबत प्रबोधन..
पनवेल / वार्ताहर :- कळंबोली वाहतूक शाखेतर्फे खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथे कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीभाऊ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सपोनि शिर्के ,पो.उपनिरीक्षक साठे व पोलीस अंमलदार यांच्यावतीने खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथे रिक्षा चालक-मालक तसेच टॅक्सी चालक व मालक यांना वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन करण्यात आले.
यावेळी नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या न करणे, बस स्टँड वर रिक्षा पार्क न करणे, सिग्नल जम्पिंग न करणे, गाडीचालवताना मोबाईल चा वापर न करणे, दारू पिऊन गाडी न चालवणे , प्रवाशांशी सौजन्याने वागणे, मीटर प्रमाणे भाडे आकारणी करणे, भाडे नाकारू नये, वाहनांची कागदपत्रे अद्यावत करणे, लेन कटिंग करू नये, स्वच्छ युनिफॉर्म परिधान करणे याबाबत प्रबोधन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी 25 ते 30 रिक्षा चालक व मालक तसेच बरेचसे रेल्वे प्रवासी हजर होते.