सील आश्रम मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित..
सील आश्रम मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित..


पनवेल दि.३०(वार्ताहर): बेघरांना आधार देऊन त्यांना मानसिक आधार देणान्या, त्यांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविण्यासाठी दुवा म्हणून काम करणाऱ्या पनवेलच्या सील आश्रमाला सामाजिक कार्यासाठी 'मदर तेरेसा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 
            मुंबई येथे रोजित नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. पनवेल तालुक्यातील नेरे गावात सील या सामाजिक संस्थेचा आश्रम आहे. समाजातील अनेक बेवारस, विविध आजारांनी ग्रासलेल्या अनाथांसाठी सील आश्रम काम करतो. 'सोशल अँड इव्हेंजेलीज असोसिएशन फॉर लव्ह', अर्थात सील संस्थेने पनवेल, नवी मुंबईत अनेकांना आधार दिला आहे. 'ह्युमेनिटी इन अॅक्शन' या कार्यक्रमात अनेक सामाजिक संस्थांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील काही महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हार्मनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्राहम मथाल यांनी सील आश्रमाला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे घोषित केले. सील आश्रमाचे संस्थापक के. एम फिलिप यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Comments