३७ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाची जिम्नॅस्ट इशिता रेवाळेची उल्लेखनीय कामगिरी.....
जिम्नॅस्ट इशिता रेवाळेची उल्लेखनीय कामगिरी.....


मुंबई / (नारायण सावंत) :- 
प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या मापसा, गोवा येथील ३७ व्या नॅशनल गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज व व्हॉल्टिंग टेबल या क्रिडा प्रकारात कांस्य पदकांची कमाई करत वैयक्तीक पाचवा क्रमांक मिळवत मुलींच्या महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवण्यास हातभार लावला. श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवल्या बद्दल इशिता वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




टीप: (डावीकडून) प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक विशाल कटकदौंड,अध्यक्ष श्री. अरविंद प्रभू , पदकविजेती इशिता सुनिल रेवाळे.
Comments