विजय दिनानिमित्त "विजय रण" मॅरेथॉन संपन्न ..
विजय दिनानिमित्त "विजय रण" मॅरेथॉन संपन्न.. 



पनवेल दि. १७ ( वार्ताहर ) : खांदा कॉलनी पनवेल येथे विजय दिवसानिमित्त विजय रण मॅरेथॉन आयोजन करण्यात करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . 
                 १६ डिसेंबर १९७१ च्या युद्धातील ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरलेल्या भारतीय लष्कराच्या शूर जवानांच्या शौर्याला व बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी हि मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तान वर विजय मिळवला होता आणि त्या युद्धात ३९०० भारतीय सैनिक शहीद झाले होते त्यांना मानवंदना म्हणून गेलं सॉलिडट्रेशन (इंडिया लिमिटेड) वतीने दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी विजय रण मॅरेथॉन आयोजित  पनवेल मध्ये करण्यात आले.संपूर्ण भारतात विविध ठिकाणी 3, 5 आणि 21 किलोमीटर पर्यंतच्या विजय रण मॅरेथॉन आयोजन विजय दिनानिमित्त करण्यात येते.यावेळी विजय दिना निमित्त शहीद झालेल्या 3900 शहिदांना मानवंदना देऊन मॅरेथॉन ला सुरवात करण्यात आली तसेच जखमी जवानांच्या कार्याला ही उपस्थित लोकांनी सलाम केला. या मॅरेथॉन मध्ये १०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात फिटीस्तान एक फिट भारत चे कॅप्टन संजय मोरे, कॅप्टन श्रीमती नियती ठक्कर, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे, इंडियन नेव्ही च्या चुकार सेकंड स्कॉडर्न नेव्हल स्टेशन करंजा या टीमचे तसेच अल्केश शहा व भावेश धनेशा आणि सिद्धेश मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.पनवेलच्या गुड मॉर्निंग रनर्स क्लब आणि जय हिंद फिटनेस ग्रुपच्या सदस्यांचे विशेष सहकार्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले.




फोटो -  मॅरेथॉन संपन्न
Comments