जेष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांच्या हस्ते गौरव दर्शन दिवाळी अंकाचे प्रकाशन...
पनवेल/ प्रतिनिधी
गौरव जहागीरदार संपादित गौरव दर्शन दिवाळी अंकाचे प्रकाशन पनवेल युवा चे संपादक तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या हस्ते शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात करण्यात आले यावेळी पत्रकार संतोष भगत, संतोष सुतार ,
रवींद्र गायकवाड ,अनिल कुरघोडे, राम बोरीले, शंकर वायदंडे ,सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .
गौरव जहागीरदार यांच्या कुटुंबात ऐन दिवाळीत दुःख असल्याने गौरव दर्शन या दिवाळी अंकाचे प्रकाशन उशिरा झाल्याचे संपादक जहागीरदार यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले ,तर या दिवाळी एकाच्या प्रकाशन वेळी जेष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जहागीरदार हे पन्नाशीनंतर हि तरुणांना हि मागे टाकत पत्रकारिता करीत आहेत ,धावपळ ,,धडपड करीत आहेत ,घरी दुःख असले तरी त्यावर मात करीत दिवाळी अंक छापून आज साईबाबांच्या शिर्डी येथील मंदिरात माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचा योग्य आला .जहागीरदार यांनी दिवाळी अंकाच्या माध्यमातून अनेक विषय हाताळले असून यापुढे हि दर्जेदार अंक प्रकाशित करावेत अशा शुभेच्छा त्यांना पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल युवा चे संपादक तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी दिल्या .