पनवेल परिसरातील ८ पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई ; मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत..
      मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत..


पनवेल दि.१२(संजय कदम): महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला यांच्या विक्रीस बंदी असतानाही बेकायदेशीरपणे अश्या प्रकारे विक्री करणाऱ्या पनवेल परिसरातील ८ पान पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभाग पेण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला हस्तगत केला आहे. 
           शहरातील गांधी हॉस्पिटल जवळील मुस्ताक पान शॉप , शिंदे पान शॉप यांच्यासह आलम पान शॉप, आयुब भाई पान शॉप, संतोष डेअरी, साईराज पान शॉप, सुरेंद्र पान शॉप, शिमला पान शॉप या विविध ठिकाणच्या पान टपऱ्यांवर  अन्न व औषध प्रशासन अधिकारी विक्रम निकम व त्यांच्या पथकाने या ८ जणांवर कारवाई करून त्यांच्या कडून जवळपास साडे तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हातगत करून त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. अश्या प्रकारच्या कारवाईमुळे बेकायदेशीर रित्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments