पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे ओएनजीसी सिग्नलजवळ वाहतूक नियमांबाबत जनजागृती.
पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे ओएनजीसी सिग्नलजवळ वाहतूक नियमांबाबत जनजागृती..


पनवेल दि.०६(संजय कदम): पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्यावतीने वाहतूक नियम पाळण्याबाबत विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते. त्यानुसार पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे ओएनजीसी सिग्नल जवळ जनजागृती करण्यात आली.  
            पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व इतर अधिकारी अंमलदार यांनी ओएनजीसी सिग्नल येथे जन जागृतीसाठी वाहन चालक मालक यांना अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे अनुषंगाने त्या बाबत सूचना देऊन हेल्मेट परिधान करणे, सेफ्टी बेल्ट लावणे, सिग्नलचे पालन करणे, गाडी वेगात न चालविणे तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच वाहन चालक-मालक यांना थकीत चलन दंड रक्कम वेळेवर भरण्याबाबत सूचनाही दिल्या.



फोटो: वाहतूक नियमांबाबत जनजागृती
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image