शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र.१७ मधील रस्त्याचे काम झाले पूर्ण..
 प्रभाग क्र.१७ मधील रस्त्याचे काम झाले पूर्ण..


पनवेल / दि.३१(वार्ताहर):  शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक १७ मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. 
            पनवेल शहरातील प्रभाग १७ मधील शिवाजी नगर येथील मुख्य रस्त्याकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या कडून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची दूरावस्था झाली होती. सदर बाब गांभीर्याने घेऊन प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान  यांनी पाठपुरावा सुरू करून शिवसेना महानगर प्रमुख मा.नगरसेवक प्रथमेश सोमण यांना फोन करून सदर बाब कळवली. रस्त्यावर खड्डे पडून रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी त्रास होत होता. सदर बाब गांभर्याने घेत त्वरित प्रथमेश सोमण यांनी महानगर पालिकेच्या संबधित विभागाशी संपर्क साधून रस्ता काँक्रीटीकरण करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे लगेचच रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले. त्याबद्दल यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रथमेश सोमण यांचे आभार मानले आहे. 



फोटो: प्रभाग १७ रोड काँक्रीटीकरण
Comments