रायगड मेडिकल असोसिएशनची दोन दिवसीय वार्षिक परिषद संपन्न ; अकराशे डॉक्टरांसह मान्यवरांची लाभली उपस्थिती....
अकराशे डॉक्टरांसह मान्यवरांची उपस्थिती....

पनवेल (प्रतिनिधी) रायगड मेडिकल असोसिएशनची दोन दिवसीय वार्षिक परिषद नुकताच उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
       या परिषदेत रायगड जिल्ह्यातील अकराशे डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी, कोरोना काळात डॉक्टरांनी चांगले काम केले असल्याचे प्रतिपादन केले. तसेच डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.  
        यावेळी केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांची डॉ. मिलिंद टिपणीस व डॉ. सुमेधा गांधी यांनी मुलाखत घेतली. याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गिरीश गुणे, डॉ. रमेश पटेल, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत, सचिव डॉ. राजेश सकपाळ, खजिनदार डॉ. संतोष आगलावे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसीय या परिषदेत तज्ज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदल, उपचार पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.  या वेळी आमदार ठाकूर यांच्या हस्ते असोसिएशनच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. अरुणकुमार भगत यांनी मनोगत व्यक्त करताना असोसिएशनच्या कार्यालयासाठी करंजाडे येथे कायमस्वरूपी उपलब्ध केल्याची माहितीही उपस्थितांना दिली.
        यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मकरंद  अनासपुरे यांनी डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत आपले विचार मांडले.  यावेळी त्यांनी बोलताना "कोरोना काळात अनेक लोक जीवाला मुकत असताना डॉक्टरांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रुग्ण सेवा करत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. डॉक्टर या भावनेतून रुग्णसेवा करतात. त्यामुळे डॉक्टर हे पृथ्वीवरील देव असल्याचे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावेळी केले. 
Comments