समाजात पूरक वातावरण टिकून राहण्यासाठी सर्व समाजबांधवांनी कटिबद्ध राहावे - आमदार प्रशांत ठाकूर
सर्व समाजाने कटिबद्ध राहावे - आ.प्रशांत ठाकूर

“शाांततापूर्ण पनवेल” ही ख्याती टिकून राहण्यासाठी सर्व समाजबांधवांनी सहकार्य करावे- पोलीस उपायुक्त: पंकज डहाणे

पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयाच्या पुढाकाराने पनवेलमध्ये शाांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन...




पनवेल / वार्ताहर : - श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी २२ जानेवारी रोजी पनवेलमध्ये कच्छी मोहल्ला परीसरात बाईक रॅलीदरम्यान दोन गटात वाद निर्माण झाले. वादाचे रूपाांतर मारहाणीत होऊन धार्मिक तेढ निर्माण झाल्याची 
परिस्थिती उद्भवली, मात्र पोलीसांनी प्रसांगावधान राखत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. यानांतर समाजात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी या उद्देशाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयाच्या पुढाकाराने शाांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन  नुकतेच करण्यात आले होते. 
 
यापप्रसंगी पनवेलचे आमदार प्रशाांत ठाकूर, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट) धनाजी क्षीरसागर, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान याांच्यासह पनवेलमधील हिंदू व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, सर्व राजकीय व सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी , सामाजिक कार्यकर्ते , प्रतिष्ठित नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी मार्गदर्शन करताना २२ जानेवारी रोजी घडलेल्या प्रकारानांतर दोन्हीही समाजाने एकोप्याच्या भावनेतून शांतता राखली. घटनास्थळी शाांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला दोन्ही समाजाने चांगला प्रतिसाद दिला. परंतु या घटनेनंतर अफवांचा बाजार उडवला जात असल्याचे निदर्शनास आले. 

त्यामुळे विनाकारण पसरवलेल्या आफवांमुळे समाजातील वातावरण बिघडते. यासाठी सर्व समाजबाांधवाांनी जागरूक राहावे, एकोप्याने राहावे. शाांततापूर्ण पनवेल अशी पनवेलची ख्याती आहे. ती टिकून राहावी यासाठी सर्व समाज बाांधवाांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले.
Comments