विविध दाखल ७ गुन्हे उघडकीस....
पनवेल दि.१८(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने एका सराईत चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून राबोडी, डोंबिवली, खांदेश्वर, कळंबोली, रबाळे, अंटोप हील या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमधील लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रात्र गस्ती करत असताना सपोनि प्रकाश पवार आणि पथक पनवेल - जे एन पी टी रोडवर गस्त घालीत असताना त्यांना सराईत गुन्हेगार अब्दुल रकीब लाल मोहम्मद खान (वय 25 वर्षे रा. रबाळे) हा त्याच्या ताब्यामध्ये असलेल्या टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक (MH 04 H 1007) सह संशयास्पद रीतीत मिळून आला. सदर इसमाकडे नमूद ट्रक बाबत विचारणा केली असता त्याने काहीही संयुक्तिक उत्तर न दिल्याने नमूद ट्रक हा चोरीचा असल्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. नमूद इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरील ट्रक राबोडी पोलीस ठाणे जिल्हा ठाणे येथून चोरी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरील संशयित इसमावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 अन्वये कारवाई दाखल करून संशयित इसमाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे,पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनी प्रकाश पवार, पोउपनी अभयसिंह शिंदे, पोउपनी विनोद लबडे, पोलीस हवालदार नितीन वाघमारे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, पोलीस हवालदार अविनाश गंथडे, पोलीस हवालदार अमोल पाटील, पोना अशोक राठोड, पोना मिथुन भोसले, पोना रवींद्र पारधी, पो ना विनोद देशमुख, पो ना लक्ष्मण जगताप, पो शी विशाल दुधे,पोशी नितीन कांबळे, पो शी साईनाथ मोकल, पो शि किरण कराड पो.शि. प्रसाद घरत यांनी तांत्रिक तपास केला असता त्याच्याकडून राबोडी, डोंबिवली, खांदेश्वर, अंटोप हील, कळंबोली, रबाळे या पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले ७ गुन्हे उघडकीस आणले. त्यामध्ये 2 लाख रु किमतीचा टाटा ट्रक नो MH 04H1007, 20,000/- रु किमतीची पल्सर मो. सा. न MH 05BL7115), 40,000/- रु किमतीची पल्सर मो. सा. न MH 05DJ1377, 15,000/- रु किमतीची होंडा डीओ मो. सा. न MH46CB1482, 20,000/- रु किमतीची पॅशन प्रो मो. सा. न MH 01AU7525,20,000/- रु किमतीची होंडा CD डिलक्स मो. सा. न MH 14BN2401, असा लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून डंपर क्रमांक MH 04EY0236 हा चोरी करून विक्री केल्याबाबत कबुली दिली आहे.दरम्यान या आरोपीस खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हात अटक करण्यात आली आहे.
फोटो: ट्रक चोरणारा गुन्हेगार मुद्देमालासह