आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते कोठारी इंटरनॅशनल स्कूलच्या चौथ्या शाखेचे उदघाटन..
      करंजाडे वसाहतीमध्ये उदघाटन संपन्न.. 

पनवेल वैभव /  दि.२०(वार्ताहर): दोन दशकांहून अधिक वर्षे उत्कृष्ठ शिक्षण देण्यासाठी सुप्रसिद्ध असणारे कोठारी इंटरॅशनल स्कूलच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन येथील करंजाडे वसाहतीमध्ये संपन्न झाले. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते फीत कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी करंजाडे ग्राम पंचायतीचे सरपंच मंगेश शेलार आणि भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            समाजातील प्रत्येक घटक हा सुशिक्षित असावा हे स्वप्न स्वर्गीय मनसुखभाई कोठारी यांनी पाहिले होते. समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा या साठी त्यांनी अनेक संस्था स्थापन करुन त्यांचे स्वप्न पूर्ण केले. शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक शाळा सुरु केल्या. मनसुख भाई कोठारी नैशनल स्कूल, पुणे, कोठारी स्टार्ज, कोठारी इंटरनॅशनल स्कूल, इंद्रायू अकॅडमी या शाळांच्या द्वारे त्यांनी शिक्षणाचा प्रसार सूरु केला.प्रत्येक शाळेत चांगल्या प्रतिचे शिक्षण, खेळ, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, तसेच यासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोठारी इंटरॅशनल स्कूल या शिक्षण संस्थेची पहिली शाळा नोएडा येथे गेल्या वीस वर्षांपूर्वी उभारली गेली. आय एस सी ई,आय बी,सी बी एस सी,केंब्रिज अशा विविध अभ्यासक्रम येथील शाळेत अंतर्भूत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पुणे येथे दोन शाळा यशस्वीरित्या विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहेत.या व्यातरिक्त मुंबई मध्ये मालाड आणि प्रभादेवी येथे दोन प्री प्रायमरी शाळा कार्यान्वित आहेत.संपूर्ण अध्ययन प्रणाली असणारी चौथी शाळा करंजाडे येथे कार्यान्वित झाली आहे. उद्घाटनाच्या दिवशी या शाळेला पालक वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला दिसत होता. शेकडो पालक विद्यार्थ्यांसह प्रवेश अर्ज प्राप्त करण्यासाठी येथे जमले होते. शिक्षण संस्थेच्या चेअर पर्सन आरती कोठारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,जवळपास सहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आमची संस्था शिक्षण देत आहे. करंजाडे मधील मुलांचे उज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही येथे शाळा स्थापन करत आहोत. संपूर्णपणाने वातानुकूलित यंत्रणेने सज्ज शाळा,आय टी केंद्रित शिक्षण, रोबोटिक्स हे सारे येथे असेल.
शिक्षण प्रणालीमध्ये जे जे नव्याने अंतर्भूत केलं जातं ते आमची शाळा नेहमीच अभ्यासक्रमात समाविष्ट करत असते. सर्वोत्कृष्ट दर्जाचे शिक्षण आम्ही देत असल्याने आमच्या शाळेतून ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारखे विद्यार्थी घडतील असा मला विश्वास वाटतो. व्हाइस चेअर मन मितेश कोठारी म्हणाले की करंजाडे वासीयांसाठी एक हक्काची शाळा सुरू करत आहोत. सी बी एस सी अभ्यासक्रमाद्वारे आम्ही येथील शाळेची सुरुवात करत आहोत. लवकरच नोएडा येथील शाळेप्रमाणे येथे केंब्रिज आणि आय बी अभ्यासक्रम देखील सुरू होतील. लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत बसची सुविधा देखील आम्ही प्रदान करणार आहोत. कोठारी इंटरनॅशनल स्कूल या संस्थेचे चेअरमन दिपक कोठारी यांनी समस्त पालकांना आवाहन केले की तुमच्या येथे शिकत असताना त्याची प्रगती पाहून निश्चितच तुम्ही एका दिवशी सांगाल की आमचा पाल्य कोठारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. उद्घाटनानंतर आपली प्रतिक्रिया देताना आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की भविष्यात करंजाडे वसाहत ही खारघर प्रमाणे विकसित होणार आहे. एका चांगल्या शाळेची या ठिकाणी गरज होती. कोठारी इंटरनॅशनल स्कूल ने ती गरज पूर्ण केली त्याबद्दल सर्व संचालकांचे मी आभार मानतो तसेच यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सर्वसमावेशक विचार करून त्यांनी शुल्क आकारावे जेणेकरून आमच्याकडे कमीत कमी तक्रारी आमच्याकडे येतील.




फोटो: कोठारी इंटरॅशनल स्कूल उदघाटन
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image