आरोपी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात...
पनवेल दि.१४ (संजय कदम): घराच्या बांधकामासाठी आणलेलं साहित्य चोरणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन घरफोडीच्या गुन्हा उघडकीस आणला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळूंद्रे गावामधील बंद घरामधून खिडकी द्वारे प्रवेश करून घरातील बांधकामासाठी आणलेल्या साहित्यापैकी एकूण ३७ हजार ८०० रुपये किमतीची वायर अज्ञात चोराने चोरली होती. या बाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये सदरचा गुन्हा हा काळूंद्रे गावातील मनोज कमलाकर कातकरी याने केला असल्याची खात्रीलायक माहिती तपास पथकास भेटली. या माहितीच्या आधारे मनोज कमलाकर कातकरी याला ताब्यात घेऊन घरफोडीच्या गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि अभय शिंदे, पो.हवा. नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, पो. ना रवींद्र पारधी, विनोद देशमुख, पो. शि. नितीन कांबळे, प्रसाद घरत, साईनाथ मोकळ यांनी केली आहे.