राज ग्रुपच्या तुलसी होममेकरचे जल्लोषात भूमिपुजन...


सिडकोच्या घरांचा पुर्नविकास प्रारंभ...



खांदा कॉलनीत तीन मजली इमारतीच्या जागेवर १४ मजली ५ टॉवर



पनवेल / प्रतिनिधी. 
नाईलाजास्तव मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या सिडको वसाहतींमधील रहिवाशांचा बुधवारचा दिवस आनंदाचा ठरला. खांदा कॉलनीतील सिडकोच्या पीएल ६ प्रकारच्या सह्याद्री सोसायटीच्या पुर्नविकासाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात बुधवारी पार पडला. तीन मजली इमारतींच्या  जागेवर अवघ्या 3 वर्षांत १४ मजली ५ टॉवर उभे राहतील आणि सर्वसामान्यांचे स्वप्न पुर्ण होणार आहे. 
३० वर्षांपुर्वी बांधलेल्या इमारतींची पडझड झाली तरी पुर्नविकासाचा कठीण प्रश्न सुटू शकला नव्हता. अनेक सोसायट्या १५ वर्षांपासून सिडकोकडे पुर्नविकासासाठी पाठपुरावा करीत होत्या. सिडकोच्या महामंडळाच्या अटी पार करून कोणताच प्रकल्प पुढे जात नव्हता.  सिडकोसह विविध विभागांच्या एनओसी मिळवून पनवेल महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविणे म्हणजे एक दिव्य होते.या सर्व  अटी शर्ती व विविध विभागांच्या परवानग्यांची शर्यत पार करून खांदा कॉलनीतील सह्याद्री सोसायटी पुर्नविकासासाठी नियुक्त केलेल्या राज ग्रुपच्या तुलसी होममेकरने बाजी मारली आहे. पुर्नविकासाची पहिली बांधकाम परवानगी मिळणे बाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यांना यश प्राप्त झाले आहे. खांदा कॉलनीतील मुंबई पुणे महामार्गांला लागून असलेल्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून पुढील काही वर्षांत १४ मजली टॉवर उभे राहणार आहे. सह्याद्री सोसायटीने पनवेल महापालिका क्षेत्रात पुर्नविकासाची बाजी मारली आहे. बुधवारी मोठ्या धुमधडाक्यात भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला. खांदा कॉलनी सेक्टर १४ येथे विकसित करण्यात येणाऱ्या सह्याद्री सोसायटी जमिनदोस्त करण्यात आली असून पुर्वीच्या तीन मजली इमारतीच्या जागेवर तब्बल १४ मजली प्रशस्त ५ टॉवर उभारले जाणार आहेत. राज ग्रुपच्या तुलसी होममेकर या कंपनीकडून हा गृहप्रकल्प विकसित केला जाणार आहे. जुन्या १९२ सदनिकाधारकांना वाढीव एरीयासह प्रशस्त नव्या घरांसह एकून ४६० नवीन घरे बांधली जाणार आहेत. शिवाय ४९ व्यवसायिक गाळे या नव्या तुलसी सह्याद्री सोसायटीत असतील अशी माहिती राज ग्रुप तुलसी होममेकर कंपनीचे प्रविणभाई पटेल आणि अभिजित पाटील यांनी सांगितले. तुलसी होममेकर कंपनीचे नवी मुंबईतील जवळपास जुन्या इमारतींच्या २२ सोसायट्यांच्या पुर्नविकासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, एरोली, वाशी येथे सदनिकाधारकांसोबत तांत्रिक मुद्द्यांवर चर्चां सुरू आहे. तसेच काही सोसायट्या पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली या भागातील आहेत. 
बाईट 
पुर्नविकास करू इच्छिणाऱ्यांना आवाहन
नवी मुंबईसह पनवेलमधील अनेक इमारती पुर्नविकासास पात्र ठरणार असल्यामुळे येत्या काळात अनेक विकासक सोसायट्यांच्या दारात उभे राहतील परंतू सोसायटी पदाधिकाऱ्यांनी विकासकाची निवड करताना काळजी घेण्याची गरज आहे. विकसकाचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव, कामाचा दर्जां, आर्थिक क्षमता आदींची खात्री केल्याशिवाय आपली इमारत पुर्नविकासास देवू नये. आर्थिक अडचणीमुळे प्रकल्प रखडल्यास सर्वसामान्यांना मोठी हानी सहन करावी लागण्याची भिती आहे. त्यामुळे काळजीपुर्वक विकासक नेमावा. 
अभिजित पाटील, संचालक 
तुलसी होममेकर - राज ग्रुप

कोट
सोसायट्यांनी  शासनाने दिनांक ०४ जुलै २०१९ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वानुसार पुनर्विकासाची कार्यपद्धती अवलंबून परिपूर्ण प्रक्रिया पार पडण्याची काळजी घ्यावी. प्रक्रियेमध्ये काहीही त्रुटी ठेऊ नये अथवा शॉटकटंचा मार्ग अवलंबू नये.जेणेकरून भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही. सर्व सभासदांना विश्वासात घेऊन संपूर्ण पारदर्शकता ठेऊन सदसदविवेबुद्धीने पूर्ण विचारांती निर्णय घेणे आवश्यक आहे.
राजीव गुरव 
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC)
अर्बन ऍनालिसिस सोल्युशन्स

कोट
कोणताही पुनर्विकास प्रकल्प राबवताना सर्व सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शकपणे काम झाले पाहिजे. अवाजवी अपेक्षांच्या मृगजळामागे धावण्यापेक्षा आपल्या प्लॉटसाठी किती FSI मिळणार आहे याची खात्री करूनच विकासकाकडे व्यावहारिक मागण्या  केल्या पाहिजेत. यात कमिटीची जबाबदारीही मोठी आहे. पुनर्विकास प्रक्रिया समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कमिटीनेही सभासदांचे हित लक्षात घेऊन काम करावे अन्यथा फसगत होऊन, प्रकल्प अर्धवट राहून आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतल्यासारखे होईल.
गणेश रोमण, अध्यक्ष 
सह्याद्री सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, खांदा कॉलनी.

Comments