अमली पदार्थ विक्रीस आलेल्या सराईत आरोपीस मुंब्रा पोलीसांकडून अटक : ५,०५००० रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत..
५,०५००० रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत..

पनवेल दि.०२(संजय कदम):  ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आधिन होवु लागल्याचे अमली पदार्थाचे सेवन व विक्री करणान्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करणाऱ्या आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार गांजा हा अमली पदार्थ विक्रीस आलेल्या सराईत आरोपीस मुंब्रा पोलीसांकडून अटक व त्याचे ताब्यातुन सुमारे २२ किलो वजनाचा गांजा, १ ठंडाई कारसह सुमारे ५,०५०००/- रू. किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
          एन.डी.पी.एस पथकातील पोउपनिरी नितीन भोसले यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून दिवा चौक जवळील जयेश वाईन शॉपच्या समोर एक इसम गांजा विकी करीता येणार आहे. सदर बातमीची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना दिली असता त्यांनी कारवाई करणे बाबत आदेशीत केले. त्यानुसार एनडीपीएस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जयेश वाईन शॉप जवळ, दिवा येथे सापळा लावला असता रात्रौ २०:४५ वाचे दरम्यान सदर ठिकाणी हुंडाई कारमधुन गांजा विको करण्याकरीता आलेला इसम नामे रहेमत खान तमिझ खान वय-३३ वर्षे राह. गॅलेक्सी अपार्टमेंट, रूम नं. ०७, अलमास कॉलनी, सैनिक नगर, मुंब्रा, यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातील हुंडाई कार क्र. एमएच ०५ डी.के.२४९७ मधुन २२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ असा जप्त करण्यात आला, सदर २२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा, हुंडाई कार व आरोपीकडील दोन मोबाईल फोन असा एकुण ५,०५०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर बाबत मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद इसमाने गांजा हा कोठुन व कोठे विकी करण्याकरीता आणला याबाबत तपास सुरु आहे.. सदरची उल्लेखनिय कारवाई मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक संजय पवार, पो.उप निरीक्षक नितीन भोसले व एन.डी.पी.एस पथकातील पोलीस अंमलदार उमेश राजपुत, प्रमोद जमदाडे, दिपक उदमले, प्रकाश गडदे यांनी केलेली असुन पुढील तपास पो. उप. निरीक्षक नितीन भोसले व पथक करीत आहेत.



फोटो: मुंब्रा पोलीस ठाण्यातील आरोपी
Comments