आजच्या तरुणाईने शिवरायांचे विचार आचरणात आणावे ; परिवर्तनच्या शिवजयंतीत वक्ते जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन
परिवर्तनच्या शिवजयंतीत वक्ते जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन


पनवेल वैभव वृत्तसेवा :     
छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते. आजपासून साडेतीनशे वर्षा आधी त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासला होता. तसेच महाराज व्यसनापासून दूर राहिले व आपल्या मावळ्यांनाही त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याची शिकवण दिली. आऊसाहेब जिजाऊंचा आदेश मानणारे, स्वराज्य स्थापन करून बहुजनांचे राज्य आणणारे छत्रपती शिवाजी महाराज आजच्या तरुणाईने आचरणात आणणे गरजेचे आहे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांनी खांदा कॉलनी येथे बोलताना व्यक्त केले. शिवजयंती निमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या  येथे प्रीतम म्हात्रे, गणेश पाटील,सदानंद शिर्के,ओंकार गावडे,प्रभाकर कांबळे, महेंद्र कांबळे, गणेश रोमन,प्रकाश पाटील,अंकुश मोहिते,सुनील कांबळे, डी एन यादव,मोहन वायकर,प्रदीप वाघमारे आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत व प्रस्ताविक आयोजक व परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, कामगार नेते महादेव वाघमारे यांनी केले. 

शिवजयंतीनिमित्त यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. शाहीर कांबळे यांनी पहाडी आवाजात ऐतिहासिक पोवाडे सादर करून तरुणाईत चैतन्य निर्माण केले.
यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे यांनी आठ वर्षांपासून अखंडपणे शिवजयंती व प्रबोधनात्मक उत्सव साजरा करत असल्याबद्दल परिवर्तन संस्था व अध्यक्ष महादेव वाघमारे यांचे कौतुक केले.

यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच खांदा कॉलनीतील महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता थोरात यांनी केले तर आभार वामन मोरे यांनी मानले.


चौकट- 

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींचे मावळे सोबत घेतले व स्वराज्य उभे केले. मावळे महाराजांसाठी प्राण द्यायला ही सदैव तत्पर असत. मावळ्यांनी छत्रपती आणि स्वराज्याशी कधी गद्दारी केली नाही. निष्ठा हे स्वराज्यातील महत्वाचे तत्व होते.
Comments