खैराच्या लाकडांसह दोघेजण ताब्यात....
पनवेल दि. १५ ( संजय कदम ) : पनवेल वन विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास कळंबोली परिसरात केलेल्या धडक कारवाईत लाखो रुपयाची खैराची लाकडे विना परवाना घेऊन जाणाऱ्या ट्रक ला ताब्यात घेतले असून या प्रकरणी ट्रक चालकासह त्याच्या सहकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
पनवेल वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे व वनपाल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाला सदर लाखो रुपये किमतीची खैराची लाकडे घेऊन वापी बाजू कडून एक ट्रक कोकणातील सावर्डे या ठिकाणी अवैध पद्धतीने घेऊन जातअसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास या पथकाने सापळा रचून संशयित ट्रकला अडवून त्याची तपासणी केली असता . त्या ट्रक मध्ये लाखो रुपये किमतीची खैराच्या झाडांची लाकडे आढळून आल्याने सदर मुद्देमाल ट्रकसह पनवेल वनविभागाने जप्त केला आहे .तसेच ट्र्क चालक अक्रम युसूफ खान शेख वय (24) राहणार सुरत आणि मन्सुरी महम्मद शहीद सलीम (27) रा. सुरत याना ताब्यात घेण्यात आले आहे .
फोटो - वन विभागाची कारवाई