करंजाडे,वडघरसह परिसरात थकीत बिल भरण्याचे महावितरण चे आवाहन ; बिल न भरल्यास वीज खंडित करणार...
थकीत बिल न भरल्यास वीज खंडित करणार...
पनवेल/प्रतिनिधी -- करंजाडे, वडघर, पारगावसह परिसरातील बंबईपाडा पर्यतच्या सर्व घरगुतीसह वीजबिलाची थकबाकी वसूलीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतली असून थकबाकीदार यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पनवेल तालुक्यातील शहरी भागातील उपविभागीय कार्यालयांपेक्षा पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागांतील वीजग्राहकांचे बिल न भरण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागांत थकबाकी वसूल करण्याची डोकेदुखी महावितरण कार्यालयापुढे आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही वीज बिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई ‘महावितरण’ने सुरू केली आहे. घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे थकीत रक्कम न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. भविष्यात वीजपुरवठा सुरळीत राहाण्यासाठी नागरिकांनी बिले भरून महावितरणला सहकार्य करावे, अन्यथा नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल,' असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
"अधिकृत केंद्र, वेबसाइट, ऑनलाइन बिल भरा"

चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीज बिल भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
Comments