मोबाईल दुकानातील घरफोडी गुन्हे शाखेने आणली उघडकीस...
मोबाईल दुकानातील घरफोडी गुन्हे शाखेने आणली उघडकीस... 



पनवेल दि.१४ (संजय कदम): खारघर वसाहती मधील एका मोबाईलच्या दुकानांमध्ये करण्यात आलेली घरफोडी गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाने सखोल तपास करून सदर घरफोडी उघडकीस आणली आहे व त्यांच्या कडून घरफोडीसाठी लागणारे सामान हस्तगत केले आहेत. 
             खारघर वसाहतीमधील एका मोबाईलच्या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबतचा तपास गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, निलेश बनकर, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, विशाल सावरकर, सुमंत बांगर, बालाजी चव्हाण, दीपक पाटील आदींचे पथक घटनास्थळांच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून व गोपनीय बातमीदाराद्वारे त्यांनी संशयित आरोपींची माहिती मिळवली त्यानुसार गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करून येथील आरोपी सतीश तपासे (वय २०), ओमकार बाबर(वय २०) व शफी शेख (वय २३) अश्या तीन आरोपीना ताब्यात घेतले आहे व त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या २ साथीदारांचा शोध पोलिसांचे पथक करीत आहेत. दरम्यान याच आरोपींची रबाळे येथे सुद्धा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
Comments