पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून फरार झालेल्या पतीस पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात..
  पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात..

पनवेल दि २३, (संजय कदम) : बहिणीकडे हैद्राबादला जाऊया असे पतीने वारंवार सांगून सुद्धा पत्नी त्याचे ऐकत नसल्याने यातून त्यांच्यात झालेल्या भांडणातून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून फरार झालेल्या पतीस तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
             रमजान सिद्दीक गाझी (वय २८) रा.खैरणे याने त्याची पत्नी अमीना (वय २८) हिला त्याच्या बहिणीकडे हैद्राबाद ला राहण्यास जाऊ या कारणावरून सतत  भांडण करून तिच्या   चेहऱ्यावर ऍसिड टाकून तिला गंभीररित्या जखमी करून तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार सतीश तांडेल, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे, पोलीस शिपाई भीमराव खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार च्या  सहाय्याने सखोल तपास करून सदर आरोपीला पनवेल रेल्वे परिसरातून ताब्यात घेतले आहे. 



फोटो - पतीला अटक
Comments