खांदेश्‍वर पोलिसांनी अवघ्या २४ तासात घरफोडी आणली उघडकीस ; २ जण ताब्यात
खांदेश्‍वर पोलिसांनी अवघ्या 24 तासात घरफोडी आणली उघडकीस ; 2 जण ताब्यात...



पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः  पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाच्या हद्दीत झालेली घरफोडी खांदेश्‍वर पोलिसांनी तक्रार दाखल होताच अवघ्या 24 तासात ही घरफोडी उघडकीस आणली असून 100% मालमत्ता हस्तगत केली आहे.
विचुंबे येथील एका घरात घरफोडी झाली होती. याबाबतची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस उप आयुक्त परि 02, विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपुत, यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. चंद्रकांत लांडगे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि समीर चासकर, पो ह महेश कांबळे, वैशाली पाटील, धिरेंद्र पाटील, उदय देसाई, पोशि सचिन पवार आदींच्या पथकाने सदर गुन्ह्याचा सीसीटीव्ही व तांत्रिक विश्‍लेषण करून घरफोडी मधील 11 तोळे वजनाचे रू 4,50,000/- सोन्याचे दागिने अशी 100% मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. व याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवघ्या 24 तासात ही घरफोडी उघडकीस आणल्याबद्दल खांदेश्‍वर पोलिसांंचे कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image