मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ३ तासांसाठी राहणार बंद...
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ३ तासांसाठी राहणार बंद...


पनवेल  / दि.२७(संजय कदम): मुंबई-पुणे महामार्ग २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजे पर्यंत रेल्वे कॉरीडोरचे काम करण्यासाठी पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.
          २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे हद्दीत पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरीडोरचे (लोखंडी गर्डर बसविण्याचे) काम  करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे कॉरीडोरचे कामाकरिता पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.
सदर कालावधीत पुणे बाजूकडे जाण्यासाठी  सर्व प्रकारची वाहने कळंबोली सर्कल - डी पॉईंट- करंजाडे - पळस्पे मार्गे NH 48 जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजुकडे वळविण्यात आलेली आहेत.तर NH 48 जुना मुंबई पुणे महामार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कोनब्रिज येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून  पुणे बाजुकडे वळविण्यात आलेली आहेत.
Comments