नागरिकांशी संवाद, विचारांची देवाणघेवाण
जगातील सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा देशवासीयांना अभिमान- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' सुरु झाले आहे. यात भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. त्या अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे मुक्काम करत समाजातील विविध घटकांशी संवाद साधला. यावेळी विचारांची देवाणघेवाण होत त्यांच्या या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकारी योजनेतील लाभार्थी, शाळा, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, नैपुण्य प्राप्त विद्यार्थी व खेळाडू, ज्येष्ठ कार्यकर्ते, नवमतदार, बूथ कमिटी, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत असून जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्व व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे १० वर्षातील प्रभावी कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती या ‘गाव चलो अभियान’ मधून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले. मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रकेही यावेळी वितरित करत लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाभार्थीची भेट घेत त्यांना मिळालेल्या योजनांची माहिती घेतली तर केवायसी व इतर तांत्रिक कारणामुळे लाभ न घेऊ शकलेल्या नागरिकांनी त्याची पूर्तता करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, महिला बचत गट, ग्रामपंचायत कार्यालय यांना सदिच्छा भेट पाहणी केली तसेच या महत्वाच्या गरजांना कायम सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासित केले. यावेळी नवमतदार, ज्येष्ठ कार्यकर्ते समाजातील प्रतिभावंत व्यक्ती तसेच खेळाडूंची ही त्यांनी भेट घेतली व त्यांचा सत्कारही केला. तसेच गावात फिरून त्यांनी लोकांशी संवाद केला त्यांना मोदी सरकारच्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या कुटुंबीयांचा, कुस्तीपटू वरुण पाटील व पैलवान शंकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक व सुविधांबाबत डॉक्टरांशी चर्चा झाली.
यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी सरपंच वासुदेव गवते, माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, सरपंच प्रकाश गडगे, उपसरपंच वंदना रोड पालकर, राम पाटील, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, माजी उपसरपंच नीलिमा पाटील, कल्पना वाघे, डॉ. रोशन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सागर पाटील, सुभाष पाटील, मेघनाथ पाटील, बूथ अध्यक्ष सुनील पाटील, अमित गवते, किरण मानकामे, रामदास पाटील, गोपाल रोडपालकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा मगर, सावित्री पाटील, मिलिंद पाटील, विक्रांत मस्कर, रोहन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक धोत्रे सर शाळा कमिटी सदस्य राजन पाटील, संगीता जोशी, सुनंदा कलोते, किशोर खारके, सतीश घाडगे, मयूर पाटील, विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान संपूर्ण देशामध्ये खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर, विभागात तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देशातील जनतेला आत्मविश्वास आणि निर्भयपणे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध विकास योजनांचा लाभ समाजातल्या अंत्योदय घटकापर्यंत पोहोचला. देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. अन्नधान्य, अवकाश संशोधन, आरोग्य, गरिबी निर्मुलन, सार्वजनिक स्वच्छता, वैद्यकीय उपचार, उद्योग, व्यापार, रोजगार, शिक्षण, समाज कल्याण अशा सर्वच क्षेत्रामध्ये भरीव काम झाले आहे. विकसित राष्ट्र म्हणून भारताची जडणघडण होत असून जगातील सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा देशवासीयांना अभिमान आहे. - आमदार प्रशांत ठाकूर, निवडणूक प्रमुख, भाजप-मावळ लोकसभा मतदार संघ