बुधवारी पनवेल महानगरपालिकेतील विकासकामांचे भूमिपूजन ...
बुधवारी पनवेल महानगरपालिकेतील विकासकामांचे भूमिपूजन ...


पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजता राज्याचे उद्योग व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कळंबोली येथे होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे असणार आहेत. 
कळंबोली मधील सेक्टर ११ येथील प्लॉट क्रमांक ६/१ येथे होणाऱ्या या समारंभास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. 
         या समारंभात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधकाम', 'खारघर नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनपृष्ठीकरण', 'कळंबोली नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनपृष्ठीकरण', 'महानगरपालिका मुख्यालय लगतच्या रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व उन्नतीकरण', 'पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गाचे काँक्रीटीकरण', तसेच 'अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या व मल प्रक्रिया केंद्र उभारणे आणि पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभारणे' या ६५१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image