स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल मध्ये वाहण्यात आली आदरांजली...
पनवेल मध्ये वाहण्यात आली आदरांजली...


पनवेल दि.२६ (वार्ताहर): भारतीय स्वतंत्र लढ्यातील आघाडीचे नेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल येथील सावकर चौक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
            यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  सावरकरांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आणि जाज्वल्य होते. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी केलेल कार्य व देशासाठी केलेला त्याग कायम स्मरणात राहील.  यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, केशवस्मृती पतपेढी चेअरमन अमित ओझे, अधिकारी सुनील भगत, महेंद्र गोडबोले, 
पतसंस्था संचालिका संगीता परदेशी, पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष संजय गुरुजी, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, सुशांत पाटणकर, तेजस वाडकर,, सोनाली शेट्टे, सुषमा भिडे, पत्रकार संजय कदम, नितीन कोळी, विशाल सावंत, हेमंत माने, हेमंत सोनावणे, परेश बोरकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.



फोटो: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आदरांजली
Comments