पनवेल एज्युकेशन सोसायटी संचालित शाळांमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ संपन्न ; अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी यांच्यातर्फे संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी....
इक्बाल काझी यांच्यातर्फे पाच लाखांची देणगी....
.
पनवेल वैभव / दि. १५ ( संजय कदम  )  :  पनवेल येथील  पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित शाळामध्ये आज  वार्षिक पारितोषिक समारंभ तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला . यावेळी   पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी यांच्यातर्फे संस्थेला ५०००००/-  ( पाच लाख ) रुपयांची देणगी देण्यात आली . 
                पनवेल एज्युकेशन  सोसायटी संचालित याकुब वेग हायस्कूल व जुनियर कॉलेज, याकुब बेग प्राथमिक शाळा व पी.ई.एस.इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज पनवेल शाळांचा वार्षिक पारितोषिक समारंभ तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संस्था संचालित याकुब वेग हायस्कूल व जुनियर कॉलेज, पनवेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून,पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक नितीन ठाकरे ,  सहा . प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत, मा. नगरसेवक मुकीत काझी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पनवेल  एज्युकेशन   सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी हे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी व संस्थेच्या इतर सदस्यांनी केले. संस्थेच्या पदाधिकारी व उपस्थितांचे स्वागत याकुब बेग शाळेचे प्राचार्य आसीम पटेल यांनी केले. सर्वप्रथम याकुब बेग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, हमद सादर केले. यानंतर तीनही शाळेच्या प्राचार्यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
यानंतर प्रमुख पाहुणे नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना अनैतिक कामापासून कसे दूर राहावे, अमली पदार्थांच्या सेवनाने होणारया दुष्परिणामांची माहिती दिली.  बजरंग राजपूत यांनी उत्कृष्ट मराठी कविता सादर केली तसेच सचिन विधाते यांनी वाहतुकीचे नियम पाळणे कसे आवश्यक आहे हे स्पष्ट केले.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी यांनी संस्था संचालित शाळासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना  सुपूर्द केला. सदर निधी संस्था संचालित शाळामध्ये सोयीसुविधा पुरविण्यासाठी वापरण्यात येणार आहे.



फोटो - पाच लाख रुपयांची देणगी
Comments