पनवेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे महानगरपालिकेने ७ दिवसात न तोडल्यास सकल हिंदू समाज आक्रमक भूमिका घेणार...
सकल हिंदू समाज आक्रमक भूमिका घेणार...


पनवेल दि.०९ (वार्ताहर): पनवेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे महानगरपालिकेने येत्या ७ दिवसात न तोडल्यास सकल हिंदू समाज आक्रमक भूमिका घेणार अशी निर्धार भूमिका पत्रकारांशी संवाद साधताना निलेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे. 
           
यावेळी निलेश पाटील यांच्यासह परेश मुरबाडकर, संजय मुरकुटे, कुणाल कुरघोडे , अकाश भाटी, रुपेश शेटे,आकाश घाटे,अण्णा आंग्रे, प्रशांत शेटे, व सकल हिंदू समाजाचे समाज बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, पनवेल शहरात श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुर्वीपासून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आनंदाच्या क्षणी समाजात तेढ निर्मांण होवू नये म्हणून आम्ही आजवर कोणतीही भूमिका घेतली नाही. एक दुर्दैवी घटना घडूनही आम्ही कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया न घेता केवळ मंदीरांमध्ये महाआरतीचे आयोजन करून निषेध नोंदवून सामनंज्यस्याची भूमिका घेतली. महाआरतींना मिळालेल्या हिंदू बांधवांचा प्रतिसाद पाहून पोलिस प्रशासनाने त्या घटनेत अनेक आरोपी अटक केले. गुन्हे दाखल केले. पोलिसांना सहकार्याची भूमिका घेवून आम्ही शांत असताना पुन्हा एकदा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला. तसेच साईनगर मधील साईराज पॅरेडाईस या इमारतीत काही हिंदू बांधवांनी सोसायटीच्या आवारात मंदीर बांधण्याचा निर्णय घेतला होता. याच इमारतीत राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाने या मंदीराला विरोध केला. पनवेल महापालिकेकडे लेखी तक्रार केली. ५ फेब्रुवारीला सकाळी अर्ज करताच पनवेल महापालिका प्रशासनाने अवघ्या काही तासात सोसायटीच्या आवारात जावून बांधकाम तोडले. तक्रारदाराच्या अर्जांला प्रत्युत्तर देखील दिले. पनवेल महापालिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू असताना पालिका प्रशासन एवढे तत्पर कसे असा सवाल त्यांनी केला आहे. सकाळी आलेल्या अर्जांवर काही तासात कारवाई करण्याची एवढे वेगवान काम महापालिकेने केले कसे. विशेष म्हणजे आम्ही २४ जानेवारीला काही ठराविक लोकांकडून होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.          
महापालिकेने आमच्या पत्राची दखल दहा दिवस झाले घेतली नाही, परंतू त्याच्या पत्रावर अवघ्या काही तासात कारवाई होते ही घटना आपल्या पनवेल शहरात घडत असताना आम्ही शांत बघत बसायचे का ?  शहरात उघडपणे बेकायदा बांधकामे केली जात आहेत. अतिक्रमण विरोधी पथकाला लाखो रूपयांचा विनाकारण खर्च केला जात आहे. तरीही अतिक्रमणे जैसे थे आहेत, परंतू एका सोसायटीच्या आवारातील मंदीर सुरू होताच तातडीने मंदीर पाडणारे प्रशासन हिंदू विरोधी आहे असा त्यांनी आरोप केला आहे. 
राष्ट्रप्रेमी नागरिकांनी शहरातील एक रस्त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी प्रशासनाने वेगवेगळी कारणे सांगून नाव देण्यास टाळाटाळ केली. परंतू खारघरमधील एका शाळेच्या संबंधित व्यक्तीचे नाव शाळेसमोरील रस्त्याला देण्याचा ठराव मात्र याच ,महानगरपालिका प्रशासनाने घेतला. सावरकरांचे नाव देण्यास टाळाटाळ करणारे प्रशासन हिंदू विरोधी आहे हे यावरून सिध्द होते. शहरातील बेकायदा बांधकामे, अतिक्रमण तोडण्याची हिंमत प्रशासनात नाही. प्रशासनाने कारवाई केली नाही म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिले आहे. आम्ही कारवाईची मागणी केली आहे. तरी देखील कारवाई झाली नाही तर यापुढे आक्रमक भूमिका घेवून पुढील आंदोलन करू असा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे पनवेल शहराशी काहीही संबंध नसलेल्या लोकांनी भारत नगर वसविले. महापालिका त्यांना पक्की घरे बांधून देणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या विरोधात हायकोर्टांत गेलेल्या या लोकांना महापालिकेला संमतीपत्र देवून घरे रिकामे करण्यास सांगितली आहेत. परंतू महापालिकेला हे सहकार्य करीत नाही. तरी महापालिका त्यांच्यावर कारवाईची भूमिका घेत नाही याचा अर्थ प्रशासन या बेकायदा लोकांना शहरात पोसण्याचे काम करते आहे. तरी य सर्व गोष्टींवर महानगरपालिकेने येत्या ७ दिवसात कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दिला आहे.




फोटो: पत्रकारांशी संवाद साधताना निलेश पाटील
Comments