तळोजात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
पनवेल दि.२९(वार्ताहर): कमलगौरी हिरू पाटील शिक्षण संस्था तळोजा फेज १ येथे सालाबाद प्रमाणे या वर्षी ही छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. त्यानुसार यावर्षी शिवजयंतीनिमित्त तळोजा येथील के.जि.पी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शास्त्रोत् पद्धतीने पूजन बबनदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, उपस्थित सर्व मान्यवारांनी व शिक्षक विद्यार्थीनी छत्रपतीनां वंदन करण्यात आले.
या वेळी दिव्या भव्य मिरवणूकी चे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीची सुरवात रथाचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मा आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील आदी अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार घालून श्रीफळ वाढवून करण्यात आले मिरवणुकीत खास आकर्षण घोड्यावरी शिवरायांच्या देशातील कलाकार, तसेच ढोलताशा पथक,शाळेचे बॅन्जो पथक लेझीम पथक ठरले. मिरवणूकित सर्व जाती धर्माचे शेकडो शाळेची नागरिक विद्यार्थी सहभागी सहभागी झाले होते. वाजत- गाजत घोषणाबाजी करत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम मावळ्यांनी या मिरवणुकीला फळे व पाणी वाटप करण्यात आले. सुमारे साडे तीन तास मिरवणूक चालू राहिली. मिरवणुकीनंतर उपस्थित सर्व मंडळींची भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने बबनदादा पाटील यांनी केली होती. यावेळी उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे आभार बबन दादा पाटील यांनी मानले.
फोटो: शिवजयंती साजरी