लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार झी २४ तास च्या आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित...
     आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित...


पनवेल / प्रतिनिधी - : झी २४ तास न्युज च्या वतीने "विकास महाराष्ट्राचा, आवाज रायगडचा" पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. 
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि चॅनलचे संपादक उपस्थित होते.पुरस्कार प्राप्तीबद्दल बोलताना, मंगेश शेलार यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाज उपयोगी केलेल्या कामाची पोचपावती मिळाली असल्याचे मत व्यक्त केले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.झी २४ तासचा  पुरस्कार हा राज्यातील उत्कृष्ट सरपंचांना दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. 
पुरस्कारासाठी निवड करताना, सरपंचांनी केलेल्या विकासकामांचा, गावातील सुव्यवस्था, आणि सामाजिक न्याय यासारख्या बाबींचा विचार केला जातो. मंगेश शेलार यांना हा पुरस्कार मिळाल्याने, त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे आणि ते इतर सरपंचांसाठी प्रेरणास्थान बनेल अशी आशा आहे.मंगेश शेलार यांनी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून अनेक उल्लेखनीय कार्ये केली आहेत. त्यांच्या कार्यकाळात गावात अनेक विकासकामे राबवण्यात येत आहेत. यात रस्ते, गटारी, आणि पाणीपुरवठा यांचा समावेश आहे. तसेच, त्यांनी गावातील सामाजिक न्याय आणि समानतेसाठीही प्रयत्न केले आहेत.
Comments