सरपंच डी बी भाई म्हात्रे यांचे महिलांनी मानले आभार..
पनवेल (प्रतिनिधी )
महिला दिन वावंजे गाव व सरपंच डी बी भाई म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख रायगड परेश भाई पाटील व महिलांनी सरपंच डी बी म्हात्रे यांचे आभार मानले तसेच महिलांनी सांगितले सरपंच आमच्यासाठी देव माणूस आहेत आम्ही सरपंचांना कुठलेही काम सांगितलं की सरपंच कधीच मागे हटत नाही गावच्या विकासासाठी सातत्याने झटत असतात परंतु महिला दिन कार्यक्रम आम्हाला ठेवायचे होते यासाठी आम्ही सरपंचांना सांगितले. त्यांनी तत्परतेने आम्हाला भरपूर मदत केली सरपंच डी.बी म्हात्रे यांनी गावामध्ये अनेक सरकारच्या माध्यमातून विकास कामे केली आहेत. त्यांच्या त् कामांचा झपाटा गावातल्या ग्रामस्थांना व गावकऱ्यांना माहित असून हेच सरपंच आम्हाला हवेत असे महिलांनी सांगितले.