पनवेल शहर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई ; गावठी हातभट्टीची दारु व दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य केले नष्ट..
गावठी हातभट्टीची दारु व दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य केले नष्ट

पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः लोकसभा निवडणुुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई करत गावठी हातभट्टीची दारु व दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ 02, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आदेश दिले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भंगारपाडा गावात प्रस्तावीत डी मार्टच्या जवळ जंगलात एक इसम गावठी दारु विक्रीसाठी गाळण्याचा व बनविण्याचा धंदा करीत असतो. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि (गुन्हे) बागवान, पोउपनि अभयसिंह शिंदे, पो.हवा. अविनाश गंथडे, पो.हवा. सूर्यकांत कुडावकर, पो.हवा.महेंद्र वायकर, पो.हवा.विनोद देशमुख, पो.शि.किरण कराड आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता 250 लिटरचे 12 प्लास्टीकचे पुर्ण भरलेले बॅरल मध्ये एकुण 60,000/रुपये किमतीचे 3000 लिटर कच्च्या दारुचे नवसागर द्रव्य तसेच दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा मिळून 250 लिटरचे 12 बॅरल मधील 3000 लिटर गावठी हातभट्टीची दारु व दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट करुन धडक कारवाई केली.



फोटो ः धडक कारवाई
Comments