उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाला भेट...
विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाला भेट... 

पनवेल दि.११(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेल येथील मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाच्या उदघाटनाला येत असताना तत्पूर्वी त्यांनी शहरातील भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. 
               यावेळी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत भाजपच्या वतीने करण्यात आले. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जनसेवा कार्यालयातुन चालणाऱ्या विविध सामाजिक कार्याची माहिती घेतली. यावेळी त्यांचे स्वागत महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील यांनी  केले. त्याच प्रमाणे भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी प्रतीकात्मक राजमुद्रा भेट दिली. यावेळी  प्रदेश कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ बांठिया यांच्यासह भाजप पदाधिकारी, नागरिक व पाटील कुटुंबीय उपस्थित होते.



फोटो: जनसेवा कार्यालय भेट
Comments