शिवसेना पनवेल उपमहानगर प्रमुखपदी सचिन मोरे यांची नियुक्ती..
पनवेल वैभव / दि. २८ ( वार्ताहर ) : हिंदू ह्नदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना नेते व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मोरे यांची पनवेल उपमहानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
पनवेल संपर्क प्रमुख राजेंद्र यादव जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत पनवेल उपमहानगर प्रमुख पदी सचिन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच संजय सावंत यांची पनवेल उपमहानगर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
फोटो - सचिन मोरे यांची नियुक्ती