परिमंडळ - २ पनवेल हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जमा करण्यासाठी गर्दी ...
परवानाधारक शस्त्रे जमा करण्यासाठी गर्दी ...


पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ - २ पनवेल हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये  परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले आहे. आचारसंहिता लागू झाल्याने पोलिस ठाणे निहाय परवानाधारक शस्त्रधारकांशी संपर्क केला जात आहे. निवडणुका झाल्यानंतर परवानाधारकांना शस्त्रे पुन्हा दिली जातील असे नवी पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.
                          नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील शस्त्र परवानाधारकांना त्यांचे परवानाधारक शस्त्रे जवळच्या संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याचे आदेश जारी केले जेणेकरून निवडणुकीच्या वेळी कोणताही अनुचित घटना घडू नये. भारतीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुका, 2024 च्या लोकसभा निवडणुका घेण्याच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आणि आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेंतर्गत कार्यरत शस्त्र विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी पथकाला शस्त्र परवानाधारकांशी संपर्क साधून त्यांच्याकडील ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शस्त्र परवाना घेतलेला व्यक्तींशी संपर्क साधला जात आहे. नियमानुसार आचारसंहिता लागू झाल्यापासून परवानाधारक शस्त्र धारकांना त्यांच्याकडील शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागात जमा करावी लागणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही शस्त्रे पोलिसांच्याच ताब्यात राहतील.सध्या परिमंडळ - २ पनवेल हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यामध्ये अश्या प्रकारे शस्त्रे जमा करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे . 



फोटो - निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जमा
Comments