खारघरमध्ये नवी मुंबईच्या वैभवात भर पाडणारे 'साई वर्ल्ड एम्पायर'
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते उदघाटन 

पनवेल : 
निखळ भव्यतेचे निर्माते, उच्च श्रेणीतील विलासी आणि आधुनिक सुविधांचे सुंदर मिश्रण असलेल्या आणि संस्कृतीचा एक सुंदर स्पर्श म्हणजेच खारघरमधील साई वर्ल्ड एम्पायर. अनेक प्रकारच्या रचनांसह, राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवण्याचा प्रयत्न पॅराडाईज ग्रुपचे संचालक मनीष भतिजा यांनी केला आहे. पॅराडाईज ग्रुपच्या माध्यमातून अनेक गौरवशाली प्रकल्प राबविले आहेत. त्यातीलच एक सर्वाधिक गौरवशाली प्रकल्प हा खारघरमध्ये साई वर्ल्ड एम्पायरच्या नावाने उभा राहिला आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजेशाही सोयीसुविधा असलेल्या साई वर्ल्ड एम्पायरच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते शुक्रवारी दि. २९ मार्च २०२४ रोजी दिमाखात पार पडले. 

यावेळी नवी मुंबई भाजपाचे आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पनवेल महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आदींसह मान्यवरांनी पॅराडाईज ग्रुपचे संचालक मनीष भतिजा यांना भेट देत शुभेच्छा दिल्या. पॅराडाईज साई वर्ल्ड एम्पायरमध्ये ओपन एअर ॲम्फीथिएटर, विश्रांती लॉन, लहान मुलांच्या जलतरण तलावासह विस्तृत जलतरण तलाव, हाय-टेक व्यायामशाळा, वातानुकूलित एरोबिक्स केंद्र, पूल डेक, टॉडलर्स पार्क, भव्य क्रीडांगण, क्रिकेट खेळपट्टी,  सायकल डॉकसह सायकलिंग ट्रॅक, स्केटिंग रिंक, जॉगिंग ट्रॅक, मिनी गोल्फ कोर्स, वातानुकूलित ध्यान हॉल, इनडोअर गेम्स रूम, वातानुकूलित स्क्वॅश कोर्ट, मिनी थिएटर, द एथेना क्लब हाऊस, मार्की क्लब हाऊस, आस्वान प्राचीन इजिप्शियन स्पा, इस्पाना किड्स पार्क, कम्युनिटी हॉल, 24x7 सुरक्षा आणि सीसीटीव्ही आदी सेवांचा समावेश साई वर्ल्ड एम्पायरमध्ये करण्यात आला आहे.
Comments